
उप्प्या ची भटकंती नमस्कार या नावाने एक ब्लॉग सुरु करतोय २६ जानेवारी पासून . गेल्या कित्येक वर्षात खूप फिरलो , उत्तर भारतात उत्तराखंड , मध्यप्रदेश , महाराष्ट्र , नेपाळ , गोवा , कर्नाटक , हैद्राबाद , भुवनेश्वर आणि ओरिसा , बंगाल आणि कोलकोत्ता खूप ठिकाणे , माणसे, प्रथा, जत्रा , स्थानिक लोककला , व्यक्ती विशेष , स्थान विशेष , महात्म्य , कला , पोशाख , घरे ,वेगवेगळी हॉटेल्स किंवा होम स्टे , त्यातले अनुभव , काही यात्रा , देव दर्शन , तर काही पिकनिक ट्रिप्स अश्या सर्व लक्षात राहणाऱ्या आणि आठवण येणाऱ्या सर्व घटक आणि घटनांचे हे एक पुनःस्मरण , उजाळा आणि त्यातून सर्वांना खूप अश्या पाहण्याच्या ठिकाणांची माहिती मिळेल हि अपेक्षा यात काय काय असणार त्याची हि झलक महाबळेश्वर कसे आणि काय पाहावे, सह्याद्रीत कडे कपारी किल्ले , दऱ्या डोंगर फिरून जे मिळाले त्या पेक्षा हे पलीकडचे , उत्तराखंड मधल्या ट्रिप्स , नर्मदा परिभ्रमण , महाराष्ट्रातल्या सफरी , कोकण , गोवा...