Day 2 नाशिक इंदोर
नाशिक इंदोर
आज सकाळी रामा हेरिटेज मधला रॉयल ब्रेकफास्ट म्हणजे एक ट्रीट असते. इडली इतकी लुसलुशीत की आपल्या हाताची बोटे त्याला touch करतात कधी हे ही कळत नाही , आणि सांबार एकदम फ्रेश त्या बरोबर सँडविच , पोहे. , फ्रूट पंच आणि आज स्पेशल म्हणून मिसळ त्या बरोबर , केक, कुकीज चहा कॉफी .. चव घेऊन बघे पर्यंत पोट भरतच.. आठ वाजता आम्ही निघालो आणि एका मस्त रस्त्यावर प्रवासाला सुरुवात केली नाशिक इंदूर रस्ता.. थोडे काम सुरू आहे नाशिक जवळ तिथून बाहेर पडलो आणि गाडी overdrive मध्ये प्रवास करायला लागली.
वाटेत बघण्या सारखे तसे काही नव्हते सो पहिला स्टॉप म्हणजे खल घाट m. नर्मदा किनारी दक्षिण तटावर जोगेश्वर महादेव.. खल घाट तेथे घाटावर जाऊन मैय्या दर्शन घेतले . महादेवाचे दर्शन घेतले आणि इंदोर कडे नर्मदा क्रॉस करून निघालो ,
इंदोर ट्रॅफिक ची भारीच मज्जा .. कोणीही कुठून ही गाडी कशीही चालवतात आणि कुठे ही कोणी ओरडत नाही का थांबणे नाही इतके स्मूथ म्हणजे आपल्या भाषेत कल्टी मारून , न कळता .. आपण तर पुण्याचे मग आम्हाला फार मज्जा आली पुण्यात पोहोचलो असेच वाटले
छप्पन दुकान , इंदूर ची मॉडर्न खाऊ गल्ली
काही खास गोष्टींची चव साबुदाणा खिचडी चटपटी फराळी
पाणीपुरी चाट बास्केट कांजी वडा, हा एक भारी आयटेम आहे, चढलेली मोहोरी आणि त्यात उडीद वडे डायरेक्ट मेंदू किक लागून ताजातवाना.... गेलात कधी तर खायला विसरू नका
इंदूर ट्रिबो हॉटेल म्हणजे भारीच .. जागा मोक्याची पण रूम मध्ये जागाच नाही 10x12 ची रूम त्यात 6x6 च बेड .. दोन बॅगा ठेवल्या की जागा संपली सांभाळून चालायला कॅट वॉक सारखे. त्याला पण जागा नाही इतकी लहान रूम , मुन्नाभाई सर्किट च डायलॉग आठवला . भाय ये रूम तो शुरू होनेसे पहले ही खतम हो गया आणि टॉयलेट ब्लॉक भारीच एका बाजुला बेसिन एका बाजुला टॉयलेट सीट आणि तिसरा बाजुला शॉवर म्हणजे आपण आत उभे राहिलो की फक्त फिरायचे आणि सगळे आवरून बाहेर अशी अडचणीची जागा.. आम्हाला तर सवयच नाही असल्या इतक्या छोट्या रूम मध्ये राहायची , परत कधी ट्रीबो मध्ये राहायचे च नाही असे ठरवून आम्ही छप्पन दुकान फिरून आल्यावर तिथून डायरेक्ट बाहेरच पडलो ..भरलेले पैसे नॉन refundable च होते ..
छप्पन दुकान , इंदूर ची मॉडर्न खाऊ गल्ली
काही खास गोष्टींची चव साबुदाणा खिचडी चटपटी फराळी
पाणीपुरी चाट बास्केट कांजी वडा, हा एक भारी आयटेम आहे, चढलेली मोहोरी आणि त्यात उडीद वडे डायरेक्ट मेंदू किक लागून ताजातवाना.... गेलात कधी तर खायला विसरू नका
सुरुची , आमची आई च जणू . इतका आग्रह धरत होती घरीच राहायला की आम्ही इंदूर मध्ये एन्ट्री घेतांना च ठरवले की फिरून झाल्यावर राहायला तिच्याकडे च जायचे .आम्ही आलो आमच्या मैत्रिणीच्या घरी आणि इतकी छान मज्जा आली , भरपूर गप्पा , आणि एकदम क ड क थंडी 11 deg
आता उद्या उज्जैन महाकाल दर्शन आणि संदिपनी ऋषी आश्रम श्रीकृष्ण सुदामा आणि बलराम यांचे जिथे शिक्षण झाले ते गुरू आणि त्यांचा आश्रम ..
Comments
Post a Comment