Posts

जबलपूर ते पचमढी

Image
           जबलपूर ते पचमढी   सकाळी नेहमी सारखे साडे आठ ला चेक आउट आणि जबलपूर मध्ये MPT कलचुरी एकदम सेंटर ला होते रेल्वे स्टेशन पासून एक किमी वर सो तिथून जबलपूर बाहेर पडायला ट्रॅफिक व्हायच्या आधीच  बरे असा विचार करून आम्ही लवकर रस्त्याला लागलो तेंदूखेडा बरेली पिपरिया करून  आम्ही पचमढि पोहोचलो..  बऱ्याच डोंगरांच्या मध्ये वसलेले हे मध्य प्रदेश चे महाबळेश्वर.. सगळे आहे पण काही नाही असे  it is an overrated hill station.. Mp मध्ये सर्व मैदानी भाग साधारण पणें ५०० मीटर वर आहेच तिथून फक्त अजून ५०० मीटर वर.. हलका घाट चढ आणि लांब चे पण सुंदर रस्ते .. ब्रिटिश टाऊन असल्याचे  पुरावे खूप .  ब्रिटिश बंगला संस्कृती आणि एक त्याला सप्लाय सपोर्ट सिस्टिम साठी लोकवस्ती . लोकल लोकांना पैसे आणि काम मिळावे या साठी खूप ठिकाणे फक्त त्याच्याच गाडीतून आणि त्यांच्याच बरोबर पहावी लागणार अशीच सोय .. आराम करायला हवा छान आणि bunglow भारीच  आणि फिरायला सगळे जवळपास  औषधी वनस्पती आणि त्या पासून बनवलेले प्रॉडक्ट्स हे इथले लोकल वैशिठ्य .. रा...

Jabalpur

Image
            पन्ना ते. जबलपूर  मकर संक्रांती  नर्मदा दर्शन  सकाळी पन्ना अभयारण्यातून वेळेवर निघालो आणि जबलपूर च्या वाटेवर लागलो पांडव फॉल्स आणि पांडव गुहा सहा किमी वर आहेत त्या बघायला  पांडव वनवासात असताना येथे येऊन गुहेत राहिले होते अशी मान्यता आहे  सुंदर जागा , दरीत उतरत खाली खाली जात एका मोठ्या तलावापाशी पोहोचते .. तिथे जातांना आपल्या लहानपणी पाटी पेन्सिल होती ना त्या पाट्या बनवायचे दगड लागतात.. (फोटो आहे) तिथून खाली गेलो की  तळे  नितळ पाणी आणि वाहते आहे तळ्याच्या बाजुला पाच छोटी मंदिरे आहेत ती पांडव मंदिरे आहेत आणि त्या खाली मोठ्या मोठ्या गुहा आहेत , त्यात , वनवासात पांडव राहायचे अशी मान्यता आहे छत्रसाल राजाने त्यांच्या शिकारीच्या छंदासाठी तिथे काही अजून गुहा सदृश बांधल्या आहेत .. आता त्या protective rooms म्हणून वापरल्या जातात . हा भाग अभयारण्याच्या  हिनोटा गेट मधून जाऊन   ही ॲक्सेस करता येतो , बफर संपल्यावर कोअर जंगल लागते त्यात आहे , जंगली श्वापदे इथे पाणी प्यायला येतात त्यामुळे येथे गाईड शिवाय जा...

Day 9 Panna

Image
 खजुराहो ते पन्ना राष्ट्रीय व्याघ्र उद्यान प्रकल्प सकाळी ब्रेकफास्ट झाल्यावर आम्ही पन्ना MPT जंगल कॅम्प ला लगेच आलो ३० मिनिटांचे २२ किमी चे अंतर फक्त आल्यावर  कॉटेज नव्हते लगेच फ्री चेक आउट होण्याची वाट पाहता पाहता पन्ना जंगल सफारी चे बुकिंग करायला गेलो नवीन रूल्स प्रमाणे आपल्याला स्वतःला लायनित उभे राहूनच बुकिंग करावे लागते .. किंवा ऑनलाईन च ..ऑनलाईन फुल्ल म्हणून मग चार गाड्या ऑफ लाईन ..त्यात दुसरा नंबर माझा मिळाला .. दोन तास लाईनीत उभे राहून  तिकीट बुक केले आणि पावणे तीन वाजता जिप्सी ४ व्हील ड्राईव्ह मध्ये बसून आम्ही आत गेलो .. बफर जंगल मधून कोअर जंगल मध्ये पोहोचल्यावर वेगवेगळ्या मातीच्या  रस्त्यावरून  जाताना घुबड , हरीण काळवीट   वगैरे दिसत होतेच अचानक एका वळणावर बिबट्या स्वताच्या मस्तीत चालतं  जातांना दिसला आणि आपल्या कॅमेरा मध्ये जेरबंद झाला  नंतर तो एका झाडावर  पटकन चढून एका फांदीवर बसला शिकारी साठी दबा धरून.. आम्ही पुढे निघालो एक थ्रील झाले अनुभवून आणि आता आम्ही वेगवेगळ्या रस्त्यावर वाघ शोधत गाईड च्या म्हणण्या प्रमाणे फिरत राहिलो आ...

Day 8 खजुराहो

Image
            खजुराहो  सिर्फ नाम ही काफी है इथे काय नाही  सुंदर शहर , archeological साईट ..mesmarising, amazing सकाळी ओरछा हून निघालो आणि  भारतातील मी फिरलेल्या रस्त्यामधला सर्वता सुंदर रस्ता आहे त्या वर 175 किमी गाडी चालवली आहे , पोटातले पाणी ही हलत नाही इतका छान बनवलेला आहे ..आपल्या मुंबई पुणे पेक्षा तर 100 पट चांगला  इतक्या स्मूथ पोहोचलो खजुराहो मध्ये की काही कळलेच नाही ..  हॉटेल चेक इन केले आणि रिसेप्शन  वर सगळे समजून घेऊन वेस्टर्न ग्रुप ऑफ टेम्पल पाहायला निघालो  खजुराहो म्हणजे कामसूत्र  अशी एक डोक्यात प्रतिमा झाली होती ती actually यायच्या आधीच   बदलली होती आणि आल्यावर तर पूर्ण बदलली ऑन लाईन पद्धतीने तिकीट काढून आत गेलो .. गाईड ची गरज नाही सर्व व्यवस्थित लिहिलेलं आहे आणि त्याचे प्रत्यंतर येते आत गेल्यावर,  इथे ही गाईड प्रचंड किमती ,आणि आत गेल्यावर कळते की गरजच नाहीये गाईड ची सर्वात आधी आपण कांदरीया महादेव मंदिरात येतो .. 1025 ते 1050  मध्ये याचे निर्माण झाले आहे, शिल्प आणि कोरीव काम अप्रतिम ...

Day 7 ओरछा

Image
            ओरछा  खजुराहो समोर ही MP ची संपदा लपून राहिली होती ती आता समोर आणली आहे MP सरकार ने  ओरछा हे ऐतिहासिक शहर भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील बेतवा या नदीच्या किनारी आहे. ते झाशीपासून सुमारे १७ किलोमीटर दूर आहे. येथे १६ च्या शतकात  हा एक किल्ला बांधण्यात आला आहे. त्याची बांधणी मुघल शैलीतील आहे. या किल्ल्यास अनेक चौकोनी आणि षटकोनी  मनोरे असून त्यात राजमहाल , (यात 500 ते 700 वर्ष जुनी पेंटिंग्ज आहेत) , जहॉंगीर महाल व राय प्रवीण महाल अशा नावाचे तीन महालही आहेत. त्यातील  जहांगीर  महालात लाकडी दरवाजे आहेत आणि राय प्रवीण महालात दगडावर केलेले नक्षीकामही आहे. भगवान रामाला ओरछाचा राजा मानले जाते. भारतातील अयोध्येशिवाय ओरछा हे एकमेव ठिकाण आहे, जिथे भगवान राम  नगरचे राजा आहेत. यामागील कथा अशी आहे: 16 व्या शतकात ओरछाचा राजा मधुकर शाह हा भगवान कृष्णाचा भक्त होता तर त्याची पत्नी राणी कुंवर गणेश ही रामाची भक्त होती. या वरून त्यांच्यात  नेहमीच वाद होत होते. एकदा राजाने राणीला आव्हान दिले की, जर खरोखर राम असेल तर त्याला ओ...