Day 9 Panna

 खजुराहो ते पन्ना राष्ट्रीय व्याघ्र उद्यान प्रकल्प

सकाळी ब्रेकफास्ट झाल्यावर आम्ही पन्ना MPT जंगल कॅम्प ला लगेच आलो ३० मिनिटांचे २२ किमी चे अंतर फक्त

आल्यावर  कॉटेज नव्हते लगेच फ्री चेक आउट होण्याची वाट पाहता पाहता पन्ना जंगल सफारी चे बुकिंग करायला गेलो

नवीन रूल्स प्रमाणे आपल्याला स्वतःला लायनित उभे राहूनच बुकिंग करावे लागते .. किंवा ऑनलाईन च ..ऑनलाईन फुल्ल म्हणून मग चार गाड्या ऑफ लाईन ..त्यात दुसरा नंबर माझा मिळाला .. दोन तास लाईनीत उभे राहून  तिकीट बुक केले आणि पावणे तीन वाजता जिप्सी ४ व्हील ड्राईव्ह मध्ये बसून आम्ही आत गेलो .. बफर जंगल मधून कोअर जंगल मध्ये पोहोचल्यावर वेगवेगळ्या मातीच्या  रस्त्यावरून  जाताना घुबड , हरीण काळवीट   वगैरे दिसत होतेच

अचानक एका वळणावर बिबट्या स्वताच्या मस्तीत चालतं  जातांना दिसला आणि आपल्या कॅमेरा मध्ये जेरबंद झाला  नंतर तो एका झाडावर  पटकन चढून एका फांदीवर बसला शिकारी साठी दबा धरून.. आम्ही पुढे निघालो









एक थ्रील झाले अनुभवून आणि आता आम्ही वेगवेगळ्या रस्त्यावर वाघ शोधत गाईड च्या म्हणण्या प्रमाणे फिरत राहिलो

आणि अश्याच एका भागात गवतातून जातांना , आम्ही शोधत असलेल्या वाघाचे अस्तित्व जाणवले  चिडीचूप शांतता ,  कॉल देऊन माकडे लंगुर गायब चितळ सांबर पण ओरडुन सांगत होते की वाघ जवळ आहे आणि गाड्या तिकडे वळवून सर्व  निघाल्या

आणि काय आश्चर्य..एक  वाघ गवतातून आम्ही चाललेल्या रस्त्यावर आला आणि आमच्या मध्ये चालू लागला

राजेशाही थाट .दमदार चाल आणि एक राजा असल्याचे त्याचे प्रत्यंतर आले.बेदरकार पण शानदार चाल आणि एक राजा जसा असतो तसाच चालत तो नदीच्या दिशेने चालत आम्हाला ३०  ४० सेकंद दर्शन देऊन गेला ..actually तो नसून ती वाघीण होती आणि तिचे ७ महिन्याचे चार male cubs आहेत ,यांच्यासाठी शिकार करायला ती बाहेर पडली होती असे गाईड नी सांगितले

पट्टेदार जंगली मोकळा आणि  राजेशाही थाट म्हणजे काय ते ह्या पहाण्यामुळे कळले







Amazing exp ..


काल खजुराहो ची  नितांत सुंदर आणि मनमोहक अशी अनुभूती आणि आज स्पेशल ट्रीट म्हणून वाघ आणि बिबट्या दोन्ही दर्शन म्हणजे योगी सरकारच्या कार्यकाळात महा कुंभ  ची पर्वणी च ..


आम्ही पण अमृत स्नान  केल्या सारखेच अनुभव करत होतो...आहोत ..


पन्ना फॉरेस्ट १५७८  sq किमी मध्ये आहे आणि त्यात आपण फक्त २०% च फिरू शकतो  वेगवेगळ्या गेट एन्ट्री मधून आम्ही तर २ टक्के  पण नाही फिरलो पण luck जबरदस्त म्हणून वाघ आणि बिबट्या दर्शन

तुम्हाला.ही करवतो..

व्हिडिओ पहावे , exclusive  आहेत कुठेही फॉरवर्ड करू नयेत ही मनापासून विनंती आणि आग्रह ही.. repurcations आपल्याला नाही पण गाईड आणि ड्रायव्हर यांना भोगावे लागतात 


सुंदर  अश्या ट्रीप चां हा high point .. व्याघ्र दर्शन ..


गूड नाइट

Comments

Popular posts from this blog

Day 1 पुणे नाशिक

Day 2 नाशिक इंदोर

Jabalpur