Day 7 ओरछा

         ओरछा 


खजुराहो समोर ही MP ची संपदा लपून राहिली होती ती आता समोर आणली आहे MP सरकार ने 

ओरछा हे ऐतिहासिक शहर भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील बेतवा या नदीच्या किनारी आहे. ते झाशीपासून सुमारे १७ किलोमीटर दूर आहे. येथे १६ च्या शतकात  हा एक किल्ला बांधण्यात आला आहे. त्याची बांधणी मुघल शैलीतील आहे. या किल्ल्यास अनेक चौकोनी आणि षटकोनी  मनोरे असून त्यात राजमहाल , (यात 500 ते 700 वर्ष जुनी पेंटिंग्ज आहेत) , जहॉंगीर महाल व राय प्रवीण महाल अशा नावाचे तीन महालही आहेत. त्यातील  जहांगीर  महालात लाकडी दरवाजे आहेत आणि राय प्रवीण महालात दगडावर केलेले नक्षीकामही आहे.

भगवान रामाला ओरछाचा राजा मानले जाते. भारतातील अयोध्येशिवाय ओरछा हे एकमेव ठिकाण आहे, जिथे भगवान राम  नगरचे राजा आहेत. यामागील कथा अशी आहे: 16 व्या शतकात ओरछाचा राजा मधुकर शाह हा भगवान कृष्णाचा भक्त होता तर त्याची पत्नी राणी कुंवर गणेश ही रामाची भक्त होती. या वरून त्यांच्यात  नेहमीच वाद होत होते. एकदा राजाने राणीला आव्हान दिले की, जर खरोखर राम असेल तर त्याला ओरछा येथे घेऊन या. राणीने अयोध्येला जाऊन भगवान रामाची 21 दिवस कठोर तपश्चर्या केली. शेवटी श्री राम त्यांच्या बालस्वरूपात तिच्यासमोर प्रकट झाले  आणि तीन अटींसह तिच्याबरोबर जाण्यास तयार झाले :

 प्रथम  म्हणजे तो ओरछाचा एकमेव राजा असेल, दुसरा कोणीही राजा नसेल. दुसरे म्हणजे जिथे त्याला एकदा ठेवले जाईल  तो फक्त तिथेच राहील आणि तिसरा म्हणजे तो एका विशिष्ट वेळी आणि काही भिक्षूंसोबत जाईल ( त्यावेळी मंदिर बंद असते) . राणीने अटी मान्य केल्या आणि अशा प्रकारे रामाला (स्वतः रामाचे प्रतिनिधित्व करणारी मूर्ती) ओरछा येथे आणण्यात आली. तेव्हापासून ओरछामध्ये राम हा एकमेव राजा आहे, आणि "राम राजा" मंदिरात दररोज पोलिसांकडून त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला जातो . इतर कोणीही व्हीआयपी किंवा मंत्री किंवा अधिकारी ओरछाला भेट देताना राज्यकर्त्यांसारखे वागत नाहीत.  सर्व जण चालत येतात आणि रांगेतून दर्शन घेतात किंवा मंडपातून , हा पैलू भगवान रामाच्या भक्तांसाठी ओरछाला एक अद्वितीय स्थान बनवतो. आणि मंदिर ही काही ठराविक वेळेत च दर्शनासाठी असते , इतर वेळी बंद.

राम राजा मंदिर  आणि इतर सर्व monuments ही  रात्री लायटिंग मुळे अत्यंत विलोभनीय दिसतात 











 जहांगीर महल आयताकृती  बांधला गेला आहे आणि प्रत्येक कोपऱ्यात घुमटाने शेवट केलेल्या गोलाकार बुरुजाने केला आहे, छतावर आठ मोठ्या  घुमटांचा मुकुट आहे, त्यांच्यामध्ये लहान घुमट आहेत, जे शोभेच्या जोडकामाने  जोडलेले आहेत. जहांगीर महाल हा मुघल वास्तुकलेचा एक सुंदर नमुना मानला जातो .

ओरछा खूप सुंदर आहे , छोटेसे गाव पण महत्वाची टुरिस्ट place

MPT चे फारच सुंदर रिसॉर्ट अगदी बेतवा नदीच्या किनाऱ्यावर च आहे आणि वाहते पाणी  आणि रिसॉर्ट मध्ये हेरिटेज रूम्स, बंगलो रूम्स आणि टेंट्स असे तीन प्रकार आहेत राहायला .. बंगलो रूम फार छान आहे  आणि well appointed

आम्ही सर्व ठिकाणे चालत च फिरलो , ओव्हर all दोन किलोमीटर मध्ये असणारी सर्व ठिकाणे चालत पाहून फिरताना 7,8 किमी चालून झाले  सहजच

उद्या खजुराहो ..

Comments

Popular posts from this blog

Day 1 पुणे नाशिक

Day 2 नाशिक इंदोर

Jabalpur